पुणे

Women’s Day Celebration : माणकोबावाडी शाळेत विविध कार्यक्रमांनी महिला दिन उत्साहात साजरा

Daund News : ता. ९ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणकोबावाडी ( ता दौंड ) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशाली आबणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम सर्व थोर महिलांच्या प्रतिमंचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ प्रांजल पवार, संगीता वाळके, निलिमा कांचन, रेणुका कांचन उपस्थित होत्या. मुख्याध्यपिका स्वाती माने यांनी उपस्थित मान्यवारांचे स्वागत केले. यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशाली आबणे म्हणाल्या, महिलांनी आपल्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ चूल आणि मुल यातुन बाहेर पडून आपलं कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. तसेच यावेळी दौंड येथील डॉ. प्रांजल पवार यांनी देखील महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ प्रांजल पवार म्हणाल्या, महिलांनी आपल्या आहार आणि आरोग्य याविषयी जागरूक राहिले पाहिजे. Women’s Day Celebration

कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महिलांचे सबलिकरण याविषयी बोलताना संगीता वाळके मॅडम यांनी महिलांना विविध शासकीय योजनाची माहिती दिली. तसेच आज सर्वच क्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध आहेत त्याचा योग्य वापर करून महिलांनी आपली प्रगती करावी असे आवाहन उपस्थित महिला व तरुणी यांना केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती माने यांनी मुलींना शिक्षणातील विविध संधी याविषयी माहिती दिली. मुलगी शिकली, प्रगती झाली हे लक्षात घेऊन आपल्या मुलींना चांगले शिक्षण द्या, मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मुलीच्या जन्माचे स्वागत करा असे आवाहन उपस्थित महिलांना केले. Women’s Day Celebration

यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे, हत्तीला शेपूट काढणे, चित्रातील महिलेला टिकली लावणे यासारखे खेळ घेण्यात आले. यानंतर सर्वांनी स्नेहभोजानचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विक्रम लांडगे सर यांनी केले, व संदीप साळवे सर यांनी उपस्थित मान्यवारांचे आभार मानले. Women’s Day Celebration

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मनोहर खताळ, यवत ग्रामपंचायत सदस्य नंदा बिचकुले, सामाजिक कार्यकर्ते मल्हारी बिचकुले, शिक्षण प्रेमी मारुती बिचकुले, तसेच धुळाजी भिसे, अंगणवाडी सेविका सुवर्णा शिवतरे, मदतनीस लालूबाई गायकवाड, तसेच शिला कऱ्हे, सुस्मिता मोरे, कोमल बिचकुले, रेखा बिचकुले, सोनाली बिचकुले, सुनीता बिचकुले, स्वाती बिचकुले, मुक्ता लकडे, आशा खताळ, सोनाली दोरगे, ताई काळे, काजल लकडे, प्रीती बिचकुले, तनुजा बिचकुले, कल्याणी बिचकुले, स्वराली बिचकुले, सोनाली बिचकुले तसेच पालक, तरुणी, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी महाजन साहेब, विस्तार अधिकारी खैरे साहेब व केंद्रप्रमुख पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. Women’s Day Celebration

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0