महिला व ज्येष्ठ नागरिकांना शनिवारी मिळणार न्याय!

•तक्रार निवारण दिन!
मुंबई :- मुंबई पोलीस आयुक्ता यांच्या संकल्पनेतून विशेष तक्रार निवारण दिन म्हणून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-7 अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस ठाण्यात नागरिकांशी थेट संवाद साधता यावा तसेच तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी आता दर शनिवारी पोलिस स्टेशननिहाय तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे.

पोलीस ठाणेमध्ये दाखल गुन्हयातील व तक्रार अर्जामधील एकुण 296 तक्रारदार व अर्जदार उपस्थित होते. त्यामध्ये 162 महिला, 59 जेष्ठ नागरिक व 75 पुरूष, यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून तक्रारदारांच्या तक्रारीचे उपस्थित पोलीस अधिकारी यांनी निरसन केलेले आहे.
तसेच मुलुंड पोलीस ठाणेस तक्रार निवारण दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमादरम्यान गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकुण 07 मोबाईल फोन पोलीस उप आयुक्त, विजयकांत सागर, परिमंडळ-7, मुंबई. सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप मोरे, मुलुंड विभाग, मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी, मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई यांचे हस्ते फिर्यादीस परत करण्यात आलेले आहेत.