•तारांकित प्रश्न, लक्षवेधी, विधेयक मंजुरी अशा कामकाजाचा तपशील जाहीर
मुंबई :— राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं असून आगामी हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये पार पडणार आहे. या पावसाळी अधिवेशनात विधानसभेपासून विधानपरिषदेपर्यंत मोठ्या प्रमाणावर कामकाज झालं, तसेच काही वेळ वाया देखील गेला, अशी माहिती उघड झाली आहे.
विधानसभा – मुद्देसूद कामकाज
विधानसभेच्या 15 बैठका पार पडल्या. यामध्ये एकूण 133 तास 4 मिनिटे कामकाज झाले. दररोज सरासरी 8 तास 55 मिनिटे कामकाज झाले. अधिवेशनात 579 तारांकित प्रश्न मंजूर झाले, परंतु फक्त 92 प्रश्नांवर चर्चा झाली.
या काळात 15 विधेयके मंजूर करण्यात आली, तर एक विधेयक मागे घेण्यात आलं. 7 अर्धातास चर्चा, तसेच 511 लक्षवेधी सूचना मंजूर, त्यापैकी 152 लक्षवेधींवर चर्चा झाली. अन्य कारणांमुळे 45 मिनिटांचा वेळ वाया गेला.
सदस्यांची उपस्थिती सरासरी 82.23 टक्के इतकी नोंदवली गेली.
विधानपरिषद – स्थैर्यपूर्ण चर्चा
विधानपरिषदेच्या देखील 15 बैठका झाल्या आणि एकूण 105 तास कामकाज झाले. दररोज सरासरी 7 तास कामकाज झालं. मंत्री अनुपस्थित असल्याने 1 तास 2 मिनिटे वेळ वाया गेला.
493 तारांकित प्रश्न स्वीकृत, त्यातील 81 प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच 202 लक्षवेधी सूचना मंजूर, त्यापैकी 79 लक्षवेधींवर चर्चा करण्यात आली. विधानसभेत मंजूर झालेली 12 विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली.सदस्यांची उपस्थिती विधानपरिषदेच्या बाबतीत 84.53 टक्के इतकी नोंदली गेली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…