West Bengal Election 2024 Live : बंगालमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 32 टक्के मतदान, जाणून घ्या कुठे आणि किती मतदान?

West Bengal Election 2024 Live Till 11PM: 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.78 टक्के मतदान झाले. याशिवाय मध्य प्रदेशमध्ये 32.38%, झारखंडमध्ये 27.40% आणि यूपीमध्ये 27.12% मतदान झाले.
ANI :- लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या Lok Sabha Election Phase 4 टप्प्यासाठी आज सोमवारी (13 मे) मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यासाठी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, चौथ्या टप्प्यात एकूण 17.7 कोटी मतदार आणि 1.92 लाख मतदान केंद्रे आहेत. Maharashtra Lok Sabha Live Update
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये West Bengal Election सर्वाधिक 32.78 टक्के मतदान झाले. याशिवाय मध्य प्रदेशात 32.38 टक्के, झारखंडमध्ये 27.40 टक्के, यूपीमध्ये 27.12 टक्के, तेलंगणात 24.31 टक्के, ओडिशामध्ये 23.28 टक्के, आंध्रमध्ये 23.10 टक्के, बिहारमध्ये 22.54 टक्के, महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान झाले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 14.94 टक्के. Maharashtra Lok Sabha Live Update