Wayanad landslides updates: वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झाले असून, त्यामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी आणि चिखल शिरला आहे.
ANI :- केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी (30 जुलै) पहाटे झालेल्या भूस्खलनाने मोठी हानी केली आहे. Wayanad landslides आतापर्यंत 151 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे वायनाडमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज काही क्षणात वायनाडला पोहोचणार आहेत. त्यांच्याशिवाय केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस हेही वायनाडला पोहोचले आहेत. दोन्ही लोक वायनाड भूस्खलनानंतर सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतील. देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज वायनाड येथे परिस्थितीचे पाहणी करणार आहे.
वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 151 वर पोहोचली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी चुरलमालामध्ये बचावकार्य सुरू केले आहे. येथे लष्कराच्या चार तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमही लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) नुसार, अग्निशमन आणि बचाव, नागरी संरक्षण, NDRF आणि स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद दलाचे सदस्य बचाव कार्यात सहभागी आहेत. डीएससी सेंटर कन्नूरमधील सुमारे 200 भारतीय लष्कराचे जवान आणि कोझिकोडमधील 122 टीए बटालियन देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.
येत्या तीन तासांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विभागाने केरळमधील पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. वायनाड, कोझिकोड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यातही येत्या तीन तासांत मुसळधार पाऊस पडणार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…