मुंबईठाणे
Trending

Water Cut News : भांडुप-विक्रोळीकरांनो पाणी जपून वापरा! 87 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम; मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे जलवाहिनीची छेद-जोडणी

Vikhroli Bhandup Water Cut News : विक्रोळी-भांडुपमध्ये पाच दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार!

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील भांडुप आणि विक्रोळी परिसरात सोमवार, 22 डिसेंबरपासून शुक्रवार, 26 डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पाच्या कामासाठी 2400 मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीच्या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद-जोडणी (Cross-Connection) काम करण्यात येणार असल्याने, पालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पाणीपुरवठ्यावर परिणाम होणारा कालावधी

सुरुवात: सोमवार, 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून.

समाप्ती: शुक्रवार, 26 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत.
एकूण कालावधी: 87 तास.

बाधित भाग आणि पाणीपुरवठ्याच्या बदललेल्या वेळा

या 87 तासांच्या कामामुळे खालील भागांत पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.

1.भांडुप पश्चिम (पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत): क्वारी मार्ग, टेंभी पाडा, कोकण नगर, समर्थ नगर, भट्टी पाडा, उत्कर्ष नगर, श्रीरामपाडा, त्रिमूर्ती नगर, वाघोबावाडी, तानाजीवाडी, राम नगर आणि शिवाजी नगर.

2.विक्रोळी पश्चिम: सकाळी 11.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत.

4.साई हिल आणि साकी विहार: रात्री 8 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत.

4.रमाबाई नगर: सायंकाळी 4.15 ते रात्री 8 वाजेपर्यंत.

5.हनुमान नगर व फुले नगर: मध्यरात्री 3.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत.

6.खिंडीपाडा: येथे 24 तास पाणीपुरवठा सुरू राहील, मात्र तो कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाणी कपातीनंतर सुरुवातीचे काही दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या ‘एस’ विभाग प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0