Sharad Pawar : शरद पवार यांच्याकडून आमदार सुनील शेळके यांना इशारा
Sharad Pawar Warning Sunil Anna Shelke : आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे :- लोणावळा येथे शरद पवार Sharad Pawar यांच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, यासाठी आमदार सुनील शेळके यांनी दमदाटी केल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी शरद पवार Sharad Pawar यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर शरद पवार यांनी थेट कार्यक्रमाच्या भाषणातच आमदार सुनील शेळके Anna Shelke यांना इशारा दिला. मी वाकड्या वाटेला जात नाही, मात्र मी शरद पवार आहे विसरू नको, तू आमदार कोणामुळे आहे हे लक्षात ठेव, माझ्या वाटेला गेलास तर मी देखील कोणाला सोडणार नाही. अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके Anna Shelke यांना गंभीर इशारा दिला होता. Sharad Pawar Warning Sunil Anna Shelke
तुझ्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेव. यापुढे असे केलेस तर मला शरद पवार म्हणतात… हे विसरू नको, मी त्या वाटेने जात नाही, मात्र गेलो तर कोणाला सोडत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांच्या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत असताना त्यांना सभेला जाऊ नका, अशी धमकी देण्यात आल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती. यावरून शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके Anna Shelke यांना तू आमदार कोणामुळे झाला हे लक्षात ठेव, असे सुनावले आहे. Sharad Pawar Warning Sunil Anna Shelke
आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली
आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने माझ्यावर अशी टीका करणे हे अपेक्षित नव्हतं, अशा शब्द सुनील शेळके यांनी भावना व्यक्त केली आहे.शरद पवार यांच्या गटामध्ये दीडशे नव्हे तर केव्हा तीस ते पस्तीस कार्यकर्ते गेले असल्याचा दावा आमदार सुनील शेळके Anna Shelke यांनी केला आहे. या कार्यक्रमाला कमी माणसे जमल्यामुळे आयोजकांच्या वतीने शरद पवार यांना खोटी माहिती दिली गेली, अशा शब्दात आमदार सुनील शेळके यांनी आयोजकांवर टीका केली आहे. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी काही मुद्दाम असले प्रकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. Sharad Pawar Warning Sunil Anna Shelke