•कोलकात्याच्या बेशिस्तीनंतर मुंबईत भव्य स्वागत; सचिन तेंडुलकर आणि सुनील छेत्रीने घेतली भेट; ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या मुलांना शिष्यवृत्ती प्रदान
मुंबई :- ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमने रविवारी फुटबॉलचा जागतिक तारा लिओनेल मेसी (Lionel Messi) याच्या ‘मेसी…मेसी’ या जयघोषांचाही अनुभव घेतला. मेसीची ही पहिली मुंबई भेट त्याच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरली.
कोलकात्यातील कार्यक्रमाला लागलेले बेशिस्तीचे गालबोट आणि हैदराबादमधील यशस्वी कार्यक्रमानंतर सर्वांचे लक्ष मुंबईतील भेटीकडे लागले होते. मुंबईने या वेळी कोणतीही निराशा न करता मेसीचे भव्य स्वागत केले. मेसी कोणताही स्पर्धात्मक सामना खेळणार नाही हे माहीत असूनही लहानग्यांपासून नेते, अभिनेते, व्यावसायिक अशा 30 हजारहून अधिक चाहत्यांनी स्टेडियममध्ये उपस्थिती लावली.
वानखेडेवर मेसीचा ‘महादेवा’ प्रोजेक्ट
मेसीसोबत त्याचे इंटर मियामी संघातील सहकारी लुइस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल हेसुद्धा वानखेडेवर उपस्थित होते. या तिघांनी ‘प्रोजेक्ट महादेवा’साठी निवड झालेल्या 30 मुले आणि 30 मुलींसह फुटबॉल खेळले.
सेलिब्रिटी प्रदर्शनीय सामन्यानंतर मेसीने पेनल्टी यशस्वीरीत्या मारली, तेव्हा चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
मेसीने मैदानावर फेरी मारताना चाहत्यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेसी यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेवा’तील मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करत करण्यात आली.
सचिन-मेसीची ऐतिहासिक भेट
या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते मेसी आणि भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री यांची भेट. क्रीडाविश्वातील या दिग्गजांची भेट सर्वाधिक लक्षवेधी ठरली. या वेळी सचिन तेंडुलकरने भारतीय संघासाठी खेळताना परिधान केलेली जर्सी मेसीला भेट दिली.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…