क्राईम न्यूजमुंबई
Trending

Sandeep Sangave Suspended : भ्रष्टाचाराचा स्फोट! शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित

Sandeep Sangave Suspended : भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे गंभीर आरोप; “महापॉवरफुल अधिकारी कोट्यवधींच्या गैरव्यवहारात गुंतला”,शिक्षणमंत्री दादा भुसे यांची तातडीने कारवाई; SIT चौकशीची घोषणा

मुंबई, :- शिक्षण विभागात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करत भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबईच्या शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे Sandeep Sangave Suspended यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. “मागील तारखा टाकून लाखो रुपये उचलले गेले असून, शेकडो फाईली अनियमितरित्या मंजूर करण्यात आल्या आहेत,” असा आरोप उपाध्याय यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केला.

या आरोपांनंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ हालचाल करत संदीप सांगवे यांना निलंबित केल्याची घोषणा सभागृहात केली. तसेच, आयएएस, आयपीएस व शिक्षणतज्ञांचा समावेश असलेली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजप आमदार संजय उपाध्याय म्हणाले, “संदीप सांगवे स्वत:ला ‘महापॉवरफुल’ अधिकारी म्हणवतो आणि वारंवार गर्वाने सांगतो की, ‘माझं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही.’”
“13 वर्षे एकाच खात्यात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने मागील तारखा टाकून सरकारी तिजोरीची कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

उपाध्याय पुढे म्हणाले, “या लक्षवेधीला विरोध करण्यासाठी दलालांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याच अधिकाऱ्याने मला थेट आव्हान दिलं की, ‘सभागृहात ही लक्षवेधी तू मांडूच शकणार नाही.’”

या प्रकरणावर आमदार रणधीर सावरकर यांनी देखील गंभीर आरोप करत सांगितले की, “संदीप सांगवे हा अधिकारी दोन ते पाच कोटी रुपयांचे व्यवहार करून संपूर्ण विधिमंडळ ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे,” अशी चर्चा सुरू आहे.

सभागृहात झालेल्या या आरोपांनंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने हस्तक्षेप करत, “संबंधित अधिकाऱ्यावर एका आठवड्यात चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल,” असं आश्वासन दिलं.

“या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. SIT मार्फत सखोल चौकशी केली जाईल. तोपर्यंत संदीप सांगवे यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे,” असे दादा भुसे यांनी जाहीर केल्यावर सभागृहात मोठा गोंधळ आणि चर्चेला उधाण आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0