
Team India Qualified For Final : इंग्लंडला नमवून भारताची सलग दुसऱ्यांदा ‘वर्ल्डकप फायनल’मध्ये धडक
मुंबई :- मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर Wankhade Stadium आज क्रिकेट प्रेमींना एका अविस्मरणीय सामन्याचा अनुभव मिळाला. टी-20 विश्वचषक 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर 7 धावांनी मात करत ऐतिहासिक विजय मिळवला. 254 धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला भारताच्या धारदार गोलंदाजीने रोखले आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. Team India Latest News


भारताचा 253 धावांचा डोंगर
तत्पूर्वी, नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली, परंतु त्यानंतर फलंदाजांनी वानखेडेच्या मैदानात चौकार-षटकारांची बरसात केली.
संजू सॅमसनचा धडाका: संजू सॅमसनने सर्वाधिक 89 धावांची शानदार खेळी करत डावाचा पाया रचला.
सहकाऱ्यांची साथ: इशान किशन (39), शिवम दुबे (43), हार्दिक पांड्या (27) आणि तिलक वर्मा (21) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 7 गडी बाद 253 धावांचा डोंगर उभा केला.
इंग्लंडचा कडवा संघर्ष अन् भारताची बाजी
254 धावांचे प्रचंड लक्ष्य समोर असताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट (5) आणि कर्णधार हॅरी ब्रूक (7) स्वस्तात माघारी परतले. मात्र, जेकब बेथल आणि विल जॅक्स यांनी इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. जेकब बेथलने झुंजार शतकी खेळी करत भारताच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. विल जॅक्सने 35 धावांचे योगदान दिले. सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक स्थितीत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी संयम राखून इंग्लंडला 246 धावांवर रोखले.
सूर्याची सेना सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये
2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर, आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा जागतिक जेतेपदाच्या उंबरठ्यावर उभा आहे. वानखेडेवरील या विजयाने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



