Wall Collapsed In Andheri : अंधेरी मध्ये इंडियन ओशन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीमध्ये संरक्षण भिंत कोसळली
•काँग्रेस कडून व्हिडिओ ट्विट, 2022 मध्ये ही याच इमारतीचे संरक्षण भिंतीचा काही भाग पडला होता, महानगरपालिकेच्या दुर्लक्ष काँग्रेसचा आरोप
मुंबई :- काल मध्यरात्रीपासूनच राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या संततधार चालू आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाचे शहर असलेले पुणे कोल्हापूर सातारा रायगड ठाणे कल्याण डोंबिवली यांसारख्या महत्त्वाच्या शहरात अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळपासूनच पुण्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की विनाकारण घराबाहेर पडू नका प्रशासनाकडून संपूर्णपणे पूर्वजन्य परिस्थिती असलेल्या ठिकाणी मदत कार्य चालू आहे धोकादायक ठिकाणी एनडीआरएफ चे टीम तैनात करण्यात आली आहे अशातच मुंबईतून अंधेरी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंधेरी पश्चिम येथील इंडियन ओशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी या इमारतीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळल्याने तेथील कारला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर ट्विट करत एक व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यामध्ये अंधेरीच्या इंडियन ओशन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे संरक्षण भिंत चा काही भाग कोसळला आहे या भिंतीचा काही भाग कोसळल्याने तेथील कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषता 2022 मध्ये ही अशाच प्रकारे पावसाच्या दरम्यान या इमारतीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला होता तसेच सोसायटीत मोठ्या प्रमाणावर बाजूला असलेल्या डोंगराचे दगडंपर्यंत आहे या सर्व घडामोडी वर महानगरपालिकेचे लक्ष नाही. असा आरोप काँग्रेसने केला आहे तसेच भविष्यात महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शासनाकडून सर्व पद्धतीने मदतकार्य युद्ध पातळीवर चालू आहे सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणी अद्यापही ओसरले नाही. शासन प्रशासनाकडून नागरिकांना मदतीचे कार्य चालू आहे तसेच नागरिकांना सुरक्षितेसाठी आवाहन करण्यात येत आहे.