Wadala TT Police News : लाचखोरी भोवली! वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि उपनिरीक्षक बडतर्फ

Wadala TT Police Officer Arrested While Taking Bribe : ACB च्या कारवाईनंतर पोलीस महासंचालकांचा कठोर निर्णय; पोलीस दलातील भ्रष्टाचारावर मोठा बडगा
मुंबई :- मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे (Wadala TT Police Stations) तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे (वय 52) आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमोडे (वय 37) यांच्यावर पोलीस महासंचालकांनी बडतर्फीची कारवाई केली आहे. Mumbai Latest Bribe News
या दोन्ही अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यापूर्वी कारवाई केली होती. पोलीस दलातील भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारस पोलीस आयुक्तांकडून पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली होती.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस महासंचालकांनी घटनेच्या 311 व्या कलमांतर्गत दोन्ही अधिकाऱ्यांची पोलीस खात्यातून बडतर्फी केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पोलीस दलाकडून थेट बडतर्फीची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या कारवाईमुळे पोलीस दलात कठोर शिस्त पाळली जाईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



