मुंबई

VSR Company Plan : शिंदे शिवसेनेचा मोठा निर्णय! ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानांना ‘लाल कंदील’; अजितदादांच्या अपघातानंतर उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारली आक्रमक भूमिका

Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता ‘व्हीएसआर’ने प्रवास करणार नाहीत | डीजीसीएकडून कंपनीच्या लेअर जेट विमानांवर आधीच बंदी | रोहित पवारांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई :- 28 जानेवारी रोजी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता संपूर्ण राजकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानात तांत्रिक त्रुटी असल्याचा संशय बळावल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे शिवसेनेचे (शिंदे गट) कोणतेही मंत्री, आमदार किंवा नेते ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाचा वापर करणार नाहीत.

स्वतः उपमुख्यमंत्रीही करणार बहिष्कार

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील आमदार आणि नेत्यांनी व्हीएसआर कंपनीच्या सुरक्षा मानकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अजित पवार ज्या चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते, ते ‘लेअर जेट’ प्रकारचे विमान होते. या विमानांच्या देखभालीबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नेत्यांचा हा प्रस्ताव मान्य केला आहे. या निर्णयामुळे आता ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

डीजीसीएची कारवाई आणि रोहित पवारांच्या थिअरीज

केंद्र सरकारची संस्था डीजीसीए (DGCA) ने यापूर्वीच व्हीएसआर कंपनीच्या सर्व लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर देशव्यापी बंदी घातली आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांमधून विमानाच्या देखभालीपासून ते वैमानिकाच्या प्रशिक्षणापर्यंत अनेक गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत. रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे आणि त्यांनी सादर केलेले पुरावे पाहता, या प्रकरणाचा तपास आता केवळ ‘अपघात’ म्हणून न होता ‘नियोजित हलगर्जीपणा’ म्हणून होण्याची शक्यता आहे.

बारामतीत ठिय्या आणि न्यायाची मागणी

दुसरीकडे, रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह आज बारामती पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. मुंबईत गुन्हा दाखल करण्यास नकार मिळाल्यानंतर त्यांनी आता बारामतीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. “महाराष्ट्राने एक अष्टपैलू नेतृत्व गमावले आहे आणि यामागील सत्य समोर यायलाच हवे,” अशी भावना सर्वसामान्य जनतेतूनही व्यक्त होत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

10 hours ago