Vitthalwadi Crime News : HL या कंपनीचा कस्टमर केअर खोटे बोलून कंपनीचे बनावट लिंक पाठवून, तब्बल 43 लाखाची फसवणूक
Vitthalwadi Crime News : ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेची आर्थिक फसवणूक, 43.10 लाखाची फसवणूक
विठ्ठलवाडी :- मोठया आर्थिक फायद्याची आमिष दाखवून परराज्यात बसून ऑनलाइन पद्धतीने लाखो रुपये बँक खात्यातून परस्पर लांबवणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीनं आताफसवणुकीचा नवा ट्रेंड शोधाला आहे. साधारणपणे शेअर मार्केटच्या नावानेच Share Market Fraud News यामध्ये मोठ्या प्रमाणे फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना एका 32 वर्षीय महिलेसोबत घडली आहे HL या कंपनीच्या कस्टमर केअर Customer Care मधून बोलत असल्याचे खोटे सांगून 43 लाख 10 हजार रुपयांचे आर्थिक फसवणूक झाल्याची घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात Vitthalwadi Poplice Station दाखल करण्यात आली आहे. Vitthalwadi Crime News
फिर्यादी महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 32 वर्षे महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या महिलेला कंपनीच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून शेअर खरेदी करण्यासाठी कंपनीचे बनावट लिंक पाठवले फिर्यादी महिला यांच्याकडून 43 लाख 10 हजार रुपये रक्कम ऑनलाईन घेऊन ती परत न करता आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 67 (ब),66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याच्या पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.डी पडवळ हे करत आहे. Vitthalwadi Crime News