Mumbai Rotary Club Cyber Awareness : रोटरी क्लबच्या सहयोगाने सायबर गुन्हे आणि सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन
विरार :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस Vasai Virar Police Cyber Awareness आयुक्तालयाच्या वतीने सामान्य नागरिकांमध्ये सायबर विषयाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने विरारमधील न्यू विवा कॉलेजमध्ये (New VIVA College) एका महत्त्वपूर्ण ‘सायबर अवेअरनेस प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले होते. ‘रोटरी क्लब ऑफ विरार’ यांच्या सहयोगाने ‘रोटरी सर्विस आठवड्या’निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Vasai Virar Cyber Crime News
आज (03 ऑक्टोबर 2025 रोजी) दुपारी 12 ते 1 दरम्यान न्यू विवा कॉलेज, विरार येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सुमारे 100 ते 150 श्रोते उपस्थित होते.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत आणि सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षिततेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सध्या घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे, सोशल मीडियासंदर्भात घडणारे गुन्हे आणि ऑनलाईन गुन्ह्यांना टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच, ऑनलाईन गुन्ह्यास बळी पडल्यास तात्काळ कोठे आणि कशाप्रकारे तक्रार नोंदविता येईल, याबद्दलही माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मदन बल्लाळ हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात रोटरी क्लबच्या अध्यक्षा उर्मिला काटकर, सचिव प्रशांत सातवी आणि विवा कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी सायबर गुन्हे जनजागृतीची पत्रकेही वाटप करण्यात आली.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930/1945 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…