Virar Tadipar News : विरार पोलीस ठाणे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार 01 वर्षासाठी तडीपार
Virar Crime News : मीरा-भाईंदर विरार वसई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील, गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला तडीपार, पोलीस आयुक्तांचे आदेश, शांतता सुव्यवस्था करिता
विरार :- आगामी काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची प्रक्रिया शांतेत व सुरळीत पार पाडण्या करीता गुन्हेगारी वृत्तीचे लोकांवर अंकुश लावुन वाढते गुन्हेगारीस आळा घालणेसाठी वरिष्ठांनी प्रतिबंधात्मक कारवाई करणे बाबत आदेश केले आहेत. त्याअनुषंगाने विरार पोलीस ठाणे रेकार्डवरील गुन्हेगारांची माहिती घेवुन, सराईत गुन्हेगार मोहम्मद सिकंदर अब्दुल गफार शेख, (51 वर्षे) बाबानगर, गोपचपाडा, विरार (पु.),याचा अभिलेखाची पाहणी करता, त्याचे विरुध्द विरार पोलीस ठाणेत अनेक गुन्हे नोंद असल्यामुळे एक वर्षाकरिता तडीपार Virar Tadipar News करण्यात आले आहे. तो मोकळा राहीला तर त्यास कायदयाची भिती न राहता तो अशाच प्रकारचे गुन्हे करिल, त्याच्या या प्रवृत्तीला कोठेतरी आळा बसुन, विरार परिसरात सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता त्याचेवर प्रतिबंधक कारवाई होणे कामी हद्दपार प्रस्ताव पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-3, विरार विभाग यांना सादर करण्यात आला होता.
त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, विरार यांनी इसम नामे.मोहम्मद सिकंदर अब्दुल गफार शेख, (51 वर्षे), यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम-56 (अ) (ब) अन्वये चौकशी करुन पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्हयांमधुन 01 वर्षा करीता हद्दपारीचे आदेश पारित केले असुन, सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
पोलीस पथक
सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, विरार, रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार संदिप जाधव, संदिप शेरमाळे, पोलीस नाईक संतोष शेंडे, पोलीस अंमलदार संदिप शेळके, यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.