Virar Crime News : 4.16 लाखांच्या ऐवजाची घरातून चोरी, जावई विरुद्ध गुन्हा दाखल, विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी 12 तासाच्या आत आरोपी गजाआड
विरार :- सासरवाडीत चोरी करणाऱ्या जावयास विरार पोलिसांच्या Virar Crime Branch गुन्हे प्रकटीकरण शाखेने नुकतीच अटक केली. इरफान अब्दुल गणी काझमी (30 वय) याने आपल्या सासूच्या भावाच्या घरी चार लाख 16 हजार रुपयांच्या दागिनेची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी Virar Police Station जावयाला 12 तासाच्या आत अटक केली असून त्याच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सविता 2023 चे कलम 331(3), 305 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Virar Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,40 वय , यांचे राहते घराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाच्या खिडकीवर ठेवलेल्या चावीचे सहाय्याने लॉक उघडून, त्यावाटे आत प्रवेश करुन एकूण 4.38 लाखांचे सोन्याचे दागिने चोरी करुन घरफोडी चोरी केली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.मौल्यवान सोन्याचे दागिन्यांची चोरीस संदर्भात असल्याने, वरिष्ठांनी गुन्हयाची उकल होण्याचे अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नमुद गुन्हयाचे घटनास्थळी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी भेट देवून, तपास सुरु केला. गुन्हयातील तक्रारदार व साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन व घटनास्थळालगत असलेल्या सी.सी.टि.व्ही. कैमेरांची पडताळणी केली असता, त्यामध्ये तक्रारदार यांची मोठी बहिणीचा जावई इरफान अब्दुल गणी काझमी, (30 वय) , हा गुन्हा पडतेवेळी आल्याचे दिसून आल्याने, इसमावर संशय बळावल्याने, त्याचेकडे कसून व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने, त्यास गुन्हयात अटक करण्यात आली, नमुद आरोपीकडे कौशल्यपूर्वक तपास करुन, त्याचेकडून एकुण 57.00 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, असे 4 लाख 16 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Virar Police Latest News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), च गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उप निरीक्षक अविनाश हाटखिळे, शिवप्रशांत कोंडेवाड, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, विशाल लोहार, संदिप शेरमाळे, पोलीस अंमलदार मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पूरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, उत्कर्ष सोनवणे यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. Virar Police Latest News