Virar Sex Racket Busted By Police : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांची कारवाई व्हाट्सअपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला
विरार :- नालासोपाराच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने कारवाई करत सेक्स रॅकेटचा Sex Racket Busted भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन एजंट महिलांना अटक केली आहेत. Sex Racket Agent Arrested तर चार पीडित महिलांचे सुटका करण्यात आली आहे. निर्मला विजय राजपूत आणि उषा राजेंद्र कंबळे असे महिला एजंट चे नावे आहेत. या व्हाट्सअप च्या माध्यमातून सेक्स व्यवसाय WhatsApp Sex Racket चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. Virar Police Latest News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला राजपूत आणि उषा कंळबे या दोन महिला आपल्या राहत्या घरी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करत असल्याबाबत खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी बोगस ग्राहकांच्या माध्यमातून व्हाट्सअप द्वारे सेक्स काम करिता काही तरुणींचे फोटो पाठवले होते. तसेच,रु.नं. 310 जिनेश्वर विहार बिल्डिंग नं.3 सी विंग तिसरा माळा, मुलजीभाई मेहता शाळेजवळ गोकुळ टाउनशिप विरार प.ता.वसई जि. पालघर येथे येण्याकरिता सांगितले होते. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकाच्या माध्यमातून सापळा रचून छापा टाकत या दोन वेश्याव्यवसाय करणाऱ्या एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी या छापेमारीमध्ये चार पीडित महिलांची सुटका केल्याचे सांगितले जात आहे.निर्मला विजय राजपुत, उषा राजेंद्र कंळबे यांच्याविरुध्द सहाय्यक फौजदार उमेश गवई यांनी सरकार तर्फे फिर्यादी दिल्याने अर्नाळा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 143(2), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे शनिवारी (17 ऑगस्ट) रोजी गुन्हा दाखल आहे. Virar Police Latest News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार गवई, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, पोलीस हवालदार शेटये, किणी, महिला पोलीस शिपाई पाटील व चालक पोलीस हवालदार पागी सर्व नेम.अनै.मा.वा. प्र.कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे. Virar Police Latest News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…