Bhiwandi Robbery News
•Virar Police arrested Cycle Robbers : कोचिंग क्लासेसच्या बाहेरील तीन सायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
विरार :- एच.आर.क्लासेस युनियन बँक, जवळ गावठाण विरार पश्चिम येथे असलेल्या क्लासेसच्या बाहेरील मुलांच्या तीन सायकली चोरी केल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी बोळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. Virar Bolij Police Station पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून भादवी कलम 303(2),3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढल्याने यावर निगराणी करण्याकरिता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. 14 डिसेंबरच्या दरम्यान एच आर क्लासेस येथे पार्क केलेल्या विद्यार्थ्यांच्या ती सायकल चोरीला गेल्याचे तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. फायरफॉक्स,कोरंडो, रेविन कंपनीच्या 45 हजार रुपयांच्या तीन सायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार गुन्ह्याचा तपास करताना आरोपींचा शोध घेताना विरार पश्चिम येथील म्हाडा मैदान येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून 45000 किमतीच्या तिन्ही सायकल हस्तगत करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपीने नालासोपारा, विरार, वसई परिसरात चोरीला गेलेल्या 68 हजार 500 रुपयांच्या 10 सायकली काढून दिले असून पोलिसांनी एकूण एक लाख 13 हजार रुपये किंमतीच्या 13 सायकली जप्त केले आहे. गुण्याचा पुढील तपास किशोर धनु हे करत आहे.
अटक आरोपींची नावे
1.सनी भाईलाल प्रजापति (26 वय रा. नेहरूनगर विलेपार्ले)
2.गौरव सुधीर साळवी (24 वय रा. वसई पूर्व)
पोलीस पथक
राजेंद्र लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्त नालासोपारा यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र तेंडुलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बोळींज पोलीस ठाणे, प्रकाश सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक किरण पंजारी, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, पोलीस हवालदार किशोर धनु, पोलीस अंमलदार रोशन पुरकर,प्रफुल सरगर, कर्मचारी सागर देशमुख यांनी केलेली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…