क्राईम न्यूजमुंबई
Trending

Virar Robbery News : वामन हरी पेठ ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी; महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

Virar Vawan Jewellery Shop Robbery Case : खरेदीच्या बहाण्याने वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या विरार येथील शाखेमध्ये महिलेने 38 हजारांच्या दागिन्यांची चोरी केली.

विरार :- सुप्रसिद्ध वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या विरारच्या शाखेवर Vaman Hari Peth Virar Jewellery Shop Robbery Case 5 नोव्हेंबरच्या दरम्यान खरेदीच्या बहाण्याने दुकानामध्ये आलेल्या एका महिलेने हाचचालाकीकरून 34 हजार 608 रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात Virar Police Station महिलाविरुद्ध 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-3 विरार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेच्या मार्फत गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नालासोपारात राहणाऱ्या विद्या गंगाधर थोरात (53 वय) या महिलेला ती राहत असलेल्या परिसरातून ताब्यात घेतले. महिलेची पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता ती गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी महिलेला विरार पोलीस ठाण्यात हजर केले असून महिलेच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त , दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त सो (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त साो (गुन्हे) मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, ज्ञानेश्वर आव्हाड, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमीत जाधव, युवराज वाघमोडे, सुनिल पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, अतिष पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0