Virar Police News : विरार वाहतूक पोलिसांकडून अधिकारी-अंमलदारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

Virar Police News : केअरवेल डायग्नोस्टिकच्या सहकार्याने 55 जणांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ; पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची घेतली काळजी
विरार :- मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-3 अंतर्गत, वाहतूक नियंत्रण शाखा, विरारने पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. दिनांक 29 जुलै, 2025 रोजी विरार वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयोजित या शिबिराला 55 अधिकारी आणि अंमलदारांनी लाभ घेतला.



केअरवेल डायग्नोस्टिक संस्थेच्या मदतीने आयोजित या शिबिरात डॉ. शुभम दुबे (हेड कन्सलटंट), डॉ. नितेश पांडे (हेड कन्सलटंट), आणि डॉ. राहुल कसबे (आय स्पेशालिस्ट) या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली. वाहतूक शाखेच्या अधिकारी/अंमलदारांसह पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 कार्यालयातील अंमलदार, भरोसा सेलचे अधिकारी व अंमलदार आणि सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, विरार विभागाचे अंमलदार यांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
पोलीस आयुक्त,अपर पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त (मुख्यालय) आणि सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक, शंकर इंदलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, विरार, महेश शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप यादव, सहाय्यक फौजदार प्रशांत म्हात्रे, पोलीस शिपाई धिरज बावळे, निलेश बधे, सुरक्षा रक्षक राजन यादव आणि सुरक्षा रक्षक तुकाराम कुंभार यांनी या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे ठरते.


