Virar News : उत्तन सागरी पोलिसांकडून बेवारस दुचाकींचा लिलाव 29 जुलै रोजी

Virar Uttan Nagar Police News : तीन दुचाकी वाहनांचा सरकारी नियमांनुसार लिलाव
विरार :- उत्तन सागरी पोलिस ठाणे Virar Uttan Nagar Police News हद्दीत सापडलेल्या बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव येत्या 29 जुलै 2025 रोजी करण्यात येणार आहे. या लिलावासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून इच्छुक नागरिकांना या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Virar Police Latest News
कायदेशीर परवानगीनंतर पुढाकार
उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेवारस अवस्थेत मिळालेल्या तीन दुचाकी वाहनांबाबत कोणतीही मालकी हक्काची मागणी न झाल्याने लिलावाची प्रक्रिया राबवली जात आहे.
भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मान्यतेनंतर लिलावास मंजुरी मिळाली असून, वाहनांचे मूल्यांकनही करण्यात आले आहे.
उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे Uttan Nagar Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेवारस अवस्थेत मिळालेल्या तीन दुचाकी वाहनांबाबत कोणतीही मालकी हक्काची मागणी न झाल्याने लिलावाची प्रक्रिया राबवली जात आहे.
भाईंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मान्यतेनंतर लिलावास मंजुरी मिळाली असून, वाहनांचे मूल्यांकनही करण्यात आले आहे.
बेवारस दुचाकींची माहिती,लिलावासाठी खालील तीन दुचाकी उपलब्ध आहेत:
1.बजाज अव्हेंजर (निळा), MH01 BC 7567
2.हिरो करिझ्मा (पांढरा), MH03 BF 1555
3.हिरो अॅक्टीव्हा (लाल), MH04 FM 5382
लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 29 जुलै रोजी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी. लिलाव प्रक्रियेचा सर्व तपशील आणि नियमावली पोलिस ठाण्यात समजावून सांगण्यात येईल.



