Virar News : सोन्याचे दागिने दोन तासात परत, बोळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची कामगिरी

Virar Breaking News : कारमध्ये विसरलेले सोन्याच्या दागिनेची बॅग पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधून परत दिली
विरार :- बोळींज नाका ते धिमई हॉलला विरार ओव्हर ब्रिज जवळ लग्न सोहळ्याकरता असा प्रवास करताना एका प्रवाशाची अनवधानाने लग्नाच्या गडबडीत सोन्याचे दागिने असणारी बॅग कारमध्ये विसरली होती. Virar Breaking News ही घटना बोळींज पोलिसांना सांगताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी तात्काळ सतर्कता दाखवून कर्मचाऱ्यांमार्फत अवघ्या दोन तासांत बॅग शोधून काढली. 2.5 लाखाचे सोन्याचे दागिने परत मिळवून देण्यात बोळींज पोलिसांना यश आले आहे.
7 फेब्रुवारी रोजी निलेश भरत सोनी (28 वय ) घरी लग्न सोहळा असल्याने, त्यांनी लग्न सोहळयातील सोन्याचे दागिने व कपडे एका सुटकेसमध्ये भरुन घेवुन, बोळींज नाका येथुन भाडयाने एक अर्टिका कार करुन, त्या कारचे डिक्कीत त्यांची सुटकेस ठेवून होती.त्या कारने त्यांचे नातेवाईकांसह विरार ओव्हर ब्रिज जवळ, विरार पश्चिम येथील धिमई हॉलला पोहचले. तेव्हा सोनी हे त्यांनी कारचे डिक्कीत ठेवलेली त्यांचे मौल्यवान वस्तूंची सुटकेस हि कारमध्येच विसरले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कार व कार चालकाचा शोध घेणे बाबत वरिष्ठांनीसुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच कौशल्याने कार व त्यावरील चालकाचा शोध घेतला असता, कार चालक हा कारसह गोखिवरे, वसई पूर्व येथे मिळून आला. कार चालकाकडे घटने बाचत विचारपुस केली असता, त्याने त्याचे कारचे डिक्कीत सुटकेस असल्या बाबत माहिती नसल्याचे सांगुन, त्याचे कारची डिक्की उघडून तपासणी केली असता सुटकेस काढून दिली. सुटकेस तपासून पाहता त्यामध्ये तक्रादार यांचे एकुण 2.50 लाखा किंमतीचे 32 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चैन, ब्रेसलेट अशी सोन्याची दागिने मिळून आलेले आहेत.सोन्याची दागिने हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रकाश कावळे, बोलींज पोलीस ठाणे यांनी निलेश भरत सोनी यांना सुपूर्द केले आहेत.
पोलीस पथक
पोर्णिमा चौघुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, वसई, अतिरिक्त कार्य, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, विरार, विजय लगारे, सहायक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली बोळींज पोलीस ठाणेचे प्रकाश कावळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक विष्णु वाघमोडे, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, पोलीस अंमलदार संदिप शेळके, रोशन पुरकर, प्रफुल सरगर,सागर देशमुख यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.