Virar Crime News : लग्नाचे आमिष दाखवून मुलीशी शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रकार चंदननगर, विरार येथे घडून आला आहे.शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने मुलीचं खाजगी आणि अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी!
विरार :- विरार येथील चंदन नगर परिसरात राहणारे एका 23 वर्षीय तरुणाने 21 वर्षीय तरूणी सोबत मैत्री केली होती. Virar Marriage Scam लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तरुण सोबत लैंगिक अत्याचार केला होता. पिडीत महिलेने शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करुन मारहाण केली त्यानंतर आरोपी याने पिडीत महीलेचे नावाचे बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून त्यावर पिडीत महीलेचे खाजगी व अर्धनग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ प्रसारीत करुन पिडीतेची बदनामी केली असून याप्रकरणी पीडित तरुणीने विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम 115(2), 351(2), 352, 356(2),79,69 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 67(अ) प्रमाणे 6 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास विरार पोलीस स्टेशन Virar Police Station हे करीत होते. गुन्हा दाखल झालेपासून स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतु तो वेळोवेळी आपला ठावठिकाणा बदलून वावरत होता त्यामुळे तो मिळून येत नव्हता. Vasai Virar Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस हवालदार हनुमंत सुरेश सूर्यवंशी यांनी आरोपीची तांत्रीक विश्लेषनावरुन माहीती घेतली असता गुन्हयातील आरोपी त्याचे वास्तव्याचे ठिकाण वारंवार बदलत होता. त्यानंतर केलेल्या तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीचे आधारे आरोपी हफीजुल्लाह आजिजुल्लाह खान (वय-23 वर्षे रा.आरटीओ ऑफीस जवळ, चंदननगर विरार पूर्व) हा आरटीओ ऑफीस जवळ, चंदननगर, विरार पूर्व येथे येणार असल्याची माहीती पोलीस हवालदार राजाराम मधुकर काळे, संतोष बापु मदने, हनुमंत सुरेश सुर्यवंशी यांनी त्या ठिकाणी साफळा लावुन त्याला (8 नोव्हेंबर ) रोजी शिताफीने ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याकरीता विरार पोलीस ठाण्यात यांचे ताब्यात देण्यात आले आहे. Vasai Virar Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेथे, मनोहर तावरे, पोलीस हवालदार हनुमंत सुर्यवंशी, राजाराम काळे, संतोष मचने, गोविंद केंद्रे, सतिष जगताप, राजविर संधु, महेश येल्हे, अनिल नागरे, पोलीस शिपाई अखिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड, अंगद मुळे, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे. Vasai Virar Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…