Virar Bolij Police Rsecue Kidnapping Girl : बोळींज पोलीसांना यश, अल्पवयीन मुलीचे सुटका अहमदाबाद रेल्वे स्थानकात सुर्यनगरी एक्सप्रेसमध्ये करण्यात आली असून सुखरुप ताब्यात घेण्यात आले आहे
विरार :- विरार पश्चिम येथील शितलनगर बिल्डींग परिसरात राहणा-या 14 वर्षीय मुलगी शाळेत गेल्यापासून पुन्हा घरात आली नाही अशी तक्रार तिच्या आईने बोळींज पोलीस ठाण्यात Bolij Police Station दिली होती. पोलिसांनी अवघ्या तीन तासात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. Virar Bolij Police Rsecue Kidnapping Girl या मुलीला पोलिसांनी बडोदा रेल्वे स्थानकातून सूर्यनगरी एक्सप्रेस मधून सुखरूप पणे ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विरार पश्चिम शितलनगर बिल्डींग परिसरात राहणा-या 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आपली मुलगी सकाळी सात वाजता शाळेत गेली असता ती अद्यापही परत आले नाही तसेच,मोबाईल फोन वरुन अल्पवयीन मुलीचे काकास हेल्प मी, किडनॅप असे मॅसेज येत आहेत अशी तक्रार बुळींज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गंभीर स्वरुपाचा व अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा असल्याने वरीष्ठांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे विचारपुस केली.अपहरण झालेल्या मुलीचे काकास मॅसेज करणा-या फोन नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता मुलगी हि मुंबईवरुन जोधपुला जाणा-या सुर्यनगरी एक्सप्रेस गाडी यामध्ये असल्याचा अंदाज आला आहे.
एक्सप्रेस सुरत रेल्वे स्थानकातुन बडोदयाच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ अल्पवयीन मुलीबाबत व गुन्हयाचे गांभीर्याबाबत गुजरात राज्यातील भरुच रेल्वे स्थानक आरपीएफ, बडोदा रेल्वे स्थानक आरपीएफ व अहमदाबाद रेल्वे आरपीएफ पोलीस ठाण्यांशी व नियंत्रण कक्षांशी संपर्क साधुन माहिती देण्यात होती.अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अहमदाबाद रेल्वे आरपीएफ यांनी 18 मार्च दरम्यान अहमदाबाद रेल्वे स्थानकात सुर्यनगरी एक्सप्रेस मध्ये सुखरुप ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची माहिती मिळाल्यापासून अवघ्या तीन तासात अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -03 , विरार, विजय लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बोळींज पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक, प्रकाश सावंत (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, पोलीस हवालदार किशोर धनु, पोलीस अंमलदार संदिप शेळके, सुखराम गडाख, तांत्रिक मदत पोलीस हवालदार नामदेव ढोणे,सोहेल शेख , परि 3 विरार कार्यालय यांनी केलेली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…