ठाणे

Virar Jugar News : विरारमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,14 जण जेरबंद

Virar Crime Branch Unit 3 Latest News : गुन्हे शाखा कक्ष-3 ची यशस्वी कारवाई, 61 हजार रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त

विरार :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून गुन्हे शाखा कक्ष-3, विरार Virar Crime Branch Unit 3 यांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल 14 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असे मिळून 61 हजार 750 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई बोळींज पोलीस Bolij Police Station ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. Virar Latest Crime News

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, विरार पूर्वेकडील म्हाडा संकुलमधील बिल्डिंग क्रमांक 14, रूम नंबर 1502 मध्ये काही लोक जुगार खेळत आहेत.मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, 28 ऑगस्ट रोजी पोलीस पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला.

या छाप्यात मिलिंद कासला, निपुन बाबर, राजन शहा, तुषार खत्री, मल्हारी बेल्लूर, मयुरेश सर्वोदे, निरज चव्हाण, मितेश पाटील, सचिन गोटीयन, रोहित पाटील, चंद्रकांत देशपांडे, दिवाक्ष बाबर, राकेश वाघेला आणि सुशांत पवार असे एकूण 14 जण ‘तीन पत्ती’ जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात बोळींज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आणि इतर पोलीस अंमलदारांचा समावेश होता.

vivek

Recent Posts