Virar Bolij Police Seized 71 Lakh Worth Drugs : 71 लाखांचा मुद्देमाल जप्त; एमडी ड्रग्ज, रोख रक्कम, मोबाईल व वाहन हस्तगत
विरार | विरारच्या बोळींज पोलिसांनी Virar Bolij Police Staion अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत 12 तस्करांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला असून, एक नायजेरियन महिला आरोपीदेखील आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 71 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 170 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 15.52 लाखांची रोख रक्कम, 26 मोबाईल व एक चारचाकी वाहन यांचा समावेश आहे. Virar Police Latest News
ही कारवाई 17 मे रोजी विरारच्या म्हाडा परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका आरोपीच्या अटकेपासून सुरू झाली. त्यानंतर बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.
तपासात मिरारोड (3), नालासोपारा (3), विरार (2), ठाणे, काशीमिरा, नायगाव आणि मुंबई दिंडोशी येथून इतर आरोपी ताब्यात घेण्यात आले. ही टोळी राज्यभर अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
अटकेतील एक नायजेरियन महिला, अबेको व्होक्टरी, हिच्यावर यापूर्वीही तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या ती बोळींज पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तिच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे.
पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले की, “हा फक्त सुरुवातीचा टप्पा आहे. खरेदी-विक्री करणाऱ्यांची साखळी मोठी आहे. अजूनही काही आरोपींचा तपास सुरू आहे.”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…