Virar Latest Drug News : विरारमधील ग्लोबल सिटी परिसरातून याकुब गफ्फार ओलासुनकान्मीला अटक; 57 ग्रॅम मेथॅडॉन जप्त
विरार :- पालघरमधील विरार परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत 11 लाख 40 हजार रुपये किमतीच्या एम.डी. (मेथॅडॉन) अंमली पदार्थासह एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे.Virar Police Latest News
काय घडले नेमके?
सोमवार, 6 ऑक्टोबर दरम्यान अंमली पदार्थ कक्ष-2 चे पथक विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी, कॉसमॉस बिल्डींग समोरील नारंगी बायपास रोडवर गस्त घालत होते. यावेळी याकुब गफ्फार ओलासुनकान्मी (वय 54, रा. नालासोपारा) (मूळ रा. लागोस, नायजेरिया) याच्या संशयास्पद हालचाली पोलिसांना दिसून आल्या. Virar Latest Crime News
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 57 ग्रॅम वजनाचा एम.डी. मेथॅडॉन नावाचा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची अंदाजित किंमत 11 लाख 40 हजार इतकी आहे.
सदर अंमली पदार्थ जप्त करून आरोपी याकुब गफ्फार ओलासुनकान्मी यास तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध बोळींज पोलीस ठाणे, विरार येथे अंमली पदार्थ विरोधी अधिनियम 1985 (NDPS Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बोळींज पोलीस पुढील तपास करत आहेत.
उत्कृष्ट कामगिरी
पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…