Virar Daru Adda Busted News : बेकायदेशीर दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल,गुन्हे शाखेची कारवाई; 200 लिटर दारू आणि कच्चा माल हस्तगत
वसई :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने Vasai Virar Crime Beanch विरारमध्ये बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी चालवणाऱ्या एका महिलेवर यशस्वी कारवाई केली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी 2.20 लाख रुपयांची दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन जप्त केले आहे. Vasai Virar Latest Crime News
नेमकी घटना काय?
10 सप्टेंबर, 2025 रोजी विरार पोलीस ठाण्यातील गस्त घालणाऱ्या पोलीस हवालदार सुनील बाळासो पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, विरार (पूर्व) येथील बरफपाडा, चंदनसार भागात जंगलामध्ये एक महिला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करत आहे.
माहितीची खात्री पटवून वरिष्ठांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसह त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना 50 वर्षीय महिला हातभट्टी चालवताना दिसली. तिच्यासमोर दोन लोखंडी पिंपांमध्ये रसायन भरलेले होते, ज्यातून एका नळीद्वारे दारू बाहेर येत होती.
लाखो रुपयांचा माल जप्त
पोलिसांनी घटनास्थळीच महिलेला ताब्यात घेतले. तिचे नाव कुंता मदन चिपाट (वय 50) असून ती याच परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी तिच्याकडून 200 लिटर तयार गावठी दारू जप्त केली. याशिवाय, जंगलात लपवून ठेवलेल्या रसायन भरलेल्या तीन मोठ्या टाक्याही मिळून आल्या. या सर्व मालाची एकूण किंमत 2 लाख 20 हजार रुपये आहे.
या प्रकरणी महिलेविरोधात विरार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…