महाराष्ट्र
Trending

Sanjay Raut : संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ राज ठाकरेंना भेट; तुरुंगातील संघर्षाचे ठसठशीत प्रतिबिंब

Sanjay Raut Gifted Book To Raj Thackeray : ठाकरे गटाच्या खासदारांचा राज ठाकरे यांच्याकडे सौजन्यवश पाठवलेला वैयक्तिक संदेश चर्चेचा विषय

मुंबई :- राजकीय वादळांमधून मार्ग काढत, वैयक्तिक सन्मान राखण्याचा आदर्श ठेवत शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे स्वतःच्या तुरुंगवासातील अनुभवांवर आधारित पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे.

“हे पुस्तक सर्वांसाठी आहे; लपवण्यासारखं काही नाही!” — राऊत यांची ठाम भूमिका

या पत्रात राऊत यांनी नमूद केले आहे की, “जुलमी सत्ताधाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवून 100 दिवस तुरुंगात डांबले. मात्र, या काळात मी स्वतःला शोधण्याचा आणि व्यवस्थेचा अस्सल चेहरा समजून घेण्याचा प्रयत्न केला. हेच अनुभव ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून शब्दबद्ध केले आहेत.”

राज ठाकरे यांना वाचनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी हे पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचवले असून, “हे पुस्तक सर्वांसाठी आहे, लपवण्यासारखं काही नाही,” असा स्पष्ट संदेशही दिला आहे.

संजय राऊत यांचा हा सौजन्यपूर्ण स्नेहविनिमय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. कटुता आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौजन्याचा हात पुढे करणाऱ्या या कृतीतून राजकारणातील परिपक्वतेचं दर्शन घडत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0