मुंबई

Virar Crime News : तरुणाला गांजा विक्री करताना पकडलं; 10 किलो गांजा जप्त

•Youth Caught Selling Drugs In Virar विरार गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा कक्ष-3,विरार पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश अजित जाधव अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

विरार :- विरार येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आकाश अजित जाधव (30 वय) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Virar Crime News त्याच्याकडून 3.03 लाखांचा 10 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदनसार, कातकरी पाडा (विरार पूर्व) परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीदायक माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-3, (विरार) शाहूराज रणवरे यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिसांनी निरीक्षक सुहास कांबळे यांचे पोलीस पथकाने दोन पंचासह चंदनसार, कातकरी पाडा येथे सापळा रचून संशयीत आरोपी आकाश अजित जाधव याला ताब्यात घेतले. Virar Crime News बॅग आणि पिशवी मध्ये दहा किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा होता. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकाश जाधव याच्यावर एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या टीम ने केली आहे.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय
, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार राकेश पवार, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago