Virar Latest Crime News : प्राध्यापक गोवारी यांच्या कुटुंबावर सोमवारी पहाटे 3 वाजता दरोडा; गोवारी दांपत्यासह मुलीवर हल्ला, तिघे विरारच्या रुग्णालयात दाखल
विरार :- विरार पश्चिमेकडील अर्नाळा बंदरपाडा गावात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध दांपत्य आणि त्यांची मुलगी असे तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर विरार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. Virar Latest Crime News
पहाटे 3 वाजता दरोडा
अर्नाळा बंदरपाडा गावात प्राध्यापक सचिन गोवारी यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरावर सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोराने घरात प्रवेश करून घरातील सदस्यांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात कुटुंबातील जगन्नाथ गोवारी (वय 76), लीला गोवारी (वय 72) आणि त्यांची मुलगी नेत्रा गोवारी (वय 52) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने विरारच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हल्लेखोरांवर तातडीने कारवाईची मागणी
या घटनेनंतर प्राध्यापक सचिन गोवारी यांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. “सध्या माझ्या आई-वडील आणि बहिणीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन, हल्लेखोरांना लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. Virar Police Latest News
या घटनेची माहिती मिळाल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे Arnala Sagari Police Station वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी पाठवून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…