Virar Crime News : घरफोडी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी केले जेरबंद, आरोपीकडून 27 लाख 65 हजार किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
विरार :- विरार पोलीस ठाणेचे (Virar Police Station) गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आली असून सराई दारू पिला पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून जवळपास 27 लाखावून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.निलप्रकाश बंगलो, राम मंदीर लेन, वर्तक वार्ड, डोंगरपाडा, विरार (प.),ज्ञ येथील तक्रारदार यांचे राहते चंगल्याचे गॅलरीच्या दरवाजाचे लॉक कोणीतरी अज्ञात चोरट्याने उचकटून त्यावाटे बंगल्यात आत प्रवेश करुन, बंगल्यातील बेडरुममधील कपाटामध्ये असलेले एकुण- 470 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेले बाबत तक्रारदार सौरभ निलप्रकाश चौधरी, (35 वर्षे), निलप्रकाश चंगलो, डोंगरपाडा, विरार (प.) यांचे तक्रारीवरुन विरार पो.ठाणे, भा.दं.वि.सं. कलम-380,454,457 प्रमाणे दि.25 एप्रिल 2024 रोजी गुन्हा नोंद केला आहे. Virar Crime News
गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळी भेट देवून, वरिष्ठांचे मागदर्शनाखाली लागलीच चार वेग-वेगळी पथके तयार करुन, गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुस मिळालेल्या सी.सी.टी.व्ही. फुटेजचे बारकाईने निरीक्षण करुन, त्याआधारे संशयीत आरोपीत निष्पन्न झाला. नमुद संशयीत आरोपीत याचा शोध घेणे कामी, अंदाजे 100 सी.सी.टी.व्ही. कैमेरे बारकाईने तपासून त्याआधारे आरोपीताचा पाठलाग करत असतांना, आरोपीत याने विरार ते बोरीवली लोकल ट्रेनने, बोरीवली येथुन मानपाडा, ठाणे पावेतो बसने व तेथुन पुढे रिक्षाने प्रवास केल्याचे दिसून आले. संशयीत आरोपी हा शेवट रिक्षातून उतरलेल्या ठिकाणी असलेल्या 300 ते 400 झोपडपट्ट्यांमध्ये शोध घेणे अडचणीचे असतांना, नमुद आरोपीताचा सदर परिसरात बुध्दकौशल्याने शोध घेतला असता, नमूद आरोपीत हा वसंतविहार, मानपाडा, ठाणे येथील असल्याची खात्री झाल्याने, लागलीच सदर ठिकाणी सापळा रचुन शिताफिने आरोपीत नामे. सोनु शेख, (43 वर्षे), रा. मानपाडा, ठाणे यास 48 तासाचे आत ताब्यात घेवुन, त्यास दि.27 एप्रिल 2024 रोजी नमुद गुन्हयात अटक केली आहे. Virar Crime News
नमुद आरोपीताचे चौकशी दरम्यान त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने हे आरोपी नावे मोतीलाल सोनी, रा. वसंतविहार, ठाणे यास विक्री केले असल्याचे निष्पन्न झाल्याने, नमुद आरोपीतास
प्रस्तुत गुन्हयात 30 एप्रिल 2024 रोजी अटक करुन, दोन्ही आरोपी यांचेकडून 1) एकुण- 395.00 ग्रॅम सोन्याचे दागिने, असा एकुण 27 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नमुद आरोपी नामे. सोनु शेख, (43 वर्षे), हा सराईत असुन, त्याचेवर मुंबई व ठाणे शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली एकुण-05 गुन्हे दाखल आहेत.
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उप निरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, पोलीस अंमलदार संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. Virar Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…