क्राईम न्यूजमुंबई

Virar Crime News : विरार पोलिसांनी 24 मोबाईल केले नागरिकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

Virar Police Recover Stolen Mobile : विरार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने यशस्वी कामगिरी करत 3 लाख 65 हजार 400 रुपये किमतीचे 24 मोबाईल नागरिकांना परत मिळवून दिले

विरार :- मोबाईल हा मानवाचा अभिवाज्य भाग बनला आहे. कारण मोबाईल मध्ये लोकांच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी साठवून ठेवलेले असतात त्यामुळे मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की त्याचे फार मोठे नुकसान सहन करावे लागते.एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अनेकदा मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. ही शक्यता विरार पोलिसांनी Virar Police खोडून काढली आहे. मंगळवारी चोरी, गहाळ झालेले 24 मोबाईल विरार पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे. Virar Police Latest News

विरार पोलीस ठाण्याच्या Virar Police Station परिसरात गेल्या काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीला तसेच हरवलेले मोबाईल शोधणे हे देखील पोलिसांच्या समोर एक मोठे आवाहन असते. विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी 3 लाख 65 हजार 400 रुपये किंमतीचे एकूण 24 मोबाईल शोधून काढले आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त जयंत भजबळे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागरिकांना परत देण्यात आले. यावेळेस नागरिकांना सायबर गुन्हेगारी, मोबाईल चोरीपासून कसे वाचावे आणि मोबाईल आणि डेटा सुरक्षित कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. मोबाईल परत मिळाल्याने, अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी अथक मेहनत करून मोबाईलचा शोध लावला आहे. Virar Police Latest News

पोलीस पथक
मधुकर पांडे, पोलीस आयुक्त मि.भा.व.वि, दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त मि.भा.व.वि, जयंत बजबळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-3, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, प्रफुल सोनार पोलीस शिपाई उत्कर्ष सोनावणे तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3, विरार यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार नामदेव ढोणे व सोहेल शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0