Virar Crime News Virar Police Busted Alchol Bhatti : पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश ; गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या व्यक्ती छापा घालून त्यास अटक करुन गावठी दारुची भट्टी उद्ध्वस्त
विरार :- आगामी लोकसभा निवडणुक 2024 Lok Sabha Election च्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य धंदयावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त, यांचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत डोंगरावर झाडाझुडपात बिलालपाडा संतोषभवन नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर येथे अवैद्य रित्या गावठी दारु तयार केली जात असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहिती प्राप्त झाली होती. Virar Crime News
बातमीच्या अनुशंगाने पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी स्वःता गुन्हे प्रकटीकरण पथकासह आज दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 06 वा. च्या सुमारास डोंगरावर झाडाझुडपात बिलालपाडा संतोषभवन नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर येथे जाऊन सदर ठिकाणी छापा मारुन तेथिल अवैद्य गावठी दारु तयार करण्यासाठी तयार केलेले 1 लाख 36 हजार 400 रुपये किंमतीचे 3 हजार 300 लिटर मिश्रण युक्त दुर्गंधी द्रव्य व २२ प्लास्टीकचे बॅरल जागीच नष्ट करण्यात आले आहे. तसेच 6 हजार 100 रुपये किमतीचे ॲल्युमिनीयम चे दोन टोप व पत्र्याचा झारा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गावठी हातभट्टी चालविणारा आरोपी प्रदीप रामा शिगडे, (30 वर्षे) रा. नालासोरापारा पूर्व ता. वसई जि. पालघर यास अटक करण्यात आली असुन सदरबाबत पेल्हार पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ग) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Virar Crime News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त , विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र यनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, संजय मासाळ, मिथुन भोईर, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहूल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Virar Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…