Virar Crime News : अर्नाळा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील हद्दपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीस अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना यश
Virar Crime News Virar Police Tadipar Criminal For Two Year : सराई आरोपीला दोन वर्षासाठी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून केले तडीपार
विरार :- आगामी लोकसभा Lok Sabha Election सार्वत्रिक निवडणुक 2024 ची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडाची या अनुषंगाने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत विवीध पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्रातील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेणे, हद्दपार करण्यात आलेल्या वास्तव्याबाबत खात्री करुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत वरिष्ठांकडुन सुचना प्राप्त झाल्या आहेत. Virar Crime News
अर्नाळा सागरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात रहाणारा सराईत आरोपी नामे मुकेश उर्फ माका विनोद मांगेला (रा. टेंभी पाडा, आगाशी, विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर )याला पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 विरार, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडील आदेश क्रमांक पोलीस उपनिरीक्षक परिमंडळ -3 हद्दपार आदेश दिनांक 1 नोव्हेंबर 2022 अन्वये पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयांच्या कार्यक्षेत्रांच्या हद्दीतून दोन (2) वर्षे कालावधीकरीता हद्दपार करण्यात आले आहे. Virar Crime News
हद्दपार करण्यात आलेला सराईत आरोपी मुकेश उर्फ माका विनोद मांगेला (31 वर्षे), (रा. टेंभी पाडा, आगाशी, विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर) हा कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्याला हद्दपार करण्यात आलेल्या क्षेत्रातील शनि मंदीर जवळ, टेंभी पाडा, आगाशी, विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर या ठिकाणी आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याला गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी 2.30 वा. चे सुमारास टेंभी पाडा, आगाशी, विरार पश्चिम येथून ताब्यात घेतले आहे. त्याने हद्दपार आदेशाचा भंग केल्याने त्याचे विरुध्द अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गुन्हा भा.दं.वि. सं. कलम 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नमुद हद्दपार आरोपी मुकेश उर्फ माका विनोद मांगेला याचे विरुध्द अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे अभिलेखावर गर्दी मारामारी, दुखापत, सरकारी नोकरास अडथळा निर्माण करणे, जबरी चोरी असे 10 पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच नमुद हद्दपार आरोपीत याचा अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गुन्हा भा.दं.वि.सं.कलम326,323,504,506,141,143,144,147,149 प्रमाणे दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी दाखल असलेल्या गुन्हयात देखील सहभाग निश्चीत झाला आहे. Virar Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, सुमित जाधव, सागर सोनवणे, गणेश यादव सर्व नेम गुन्हे शाखा, कक्ष 3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेम सायबर सेल यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.