Virar Crime News : सोनसाखळी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक ; महिला आणि अल्पवयीन मुलाचाही सहभाग
विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची कारवाई
विरार :- सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून 100% मुद्देमाल हस्तगत केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. सोनसाखळी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.तसेच,एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार स्टेशन रोड येथे पायी चालत असताना रिद्धी सिद्धी अपार्टमेंटच्या समोर आल्या असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली होती. विरार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपासून एकापाठोपाठ चैन चोरीच्या घटना वाढल्याने. त्यामुळे अशा गुन्हयांना आळा घालणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी तात्काळ मार्गदर्शन व सुचना देवून पथके रवाना केली. विरार गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण विभागाच्या दोन पथकाने घटनास्थळापासून तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी केली असता गुन्ह्यातील आरोपी शिर्डी नगर, आचोळे, नालासोपारा पूर्व या परीसरातील असल्याचे निष्पन्न झाले. अनोळखी आरोपींचा गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेतला असता, आरोपी हे आचोळे गावचे डोंगरावरील झाडी-झुडपांमध्ये लपवुन बसलेले असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. शुभम जाधव, (22 वय),महिला आरोपी (20 वय) व अल्पवयीन बालक यांस ताब्यात घेतले आहे, सोनसाखळी चोरीच्या गुन्हयात अटक केली आहे. आरोपी व अल्पवयीन गुन्हेगार यांचेकडे बुध्दी कौशल्यपूर्वक चौकशी त्यांचेकडून एकुण 18 ग्रॅम सोन्याचे चैन, असा 100 टक्के मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उप निरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, पोलीस अंमलदार मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफूल सोनार, उत्कर्ष सोनवणे तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे, पोलीस अंमलदार सोहेल शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.