Virar Crime News : ज्वेलर्स दुकानात चोरी, आरोपी महिलेला अटक
•Theft In Jewellery Shop In Virar दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोने खरेदीसाठी नागरीकांची गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेण्यासाठी ही महिला विरारमध्ये दाखल झाली होती.
विरार :- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोने खरेदीसाठी नागरीकांची गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेण्यासाठी ही महिला विरारमध्ये दाखल झाली होती. तीने आगाशी रोड असलेल्या विठ्ठल मंदिराच्या समोर प्रकाश ज्वेलर्स दुकानात सोन्याची जेन्टस आणि लेडीजचे पंजाबी कडा दाखवण्यास सांगितले. यानंतर दुकान मालक आणि कामगार यांची नजर चुकवून कडा घेऊन निघून गेली. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात दुकान मालक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. गुन्हयाचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता, तीने पुर्णपणे बुरखा परीधान केला होता. त्यामुळे तीची तात्काळ माहीती मिळणे अशक्य होते. त्यानंतर घटनास्थळावरुन आरोपी ज्या विकाणाहून गेली त्या दिशेचे जवळ जवळ 300 ते 400 सीसीटीव्ही कैमेरे पाहून महीलेचा चेहरा विरार रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही कॅमे-यात दिसून आला. तिचे वर्णनावरुन आरोपी महीलेचा मुंबई येथील गुन्ह्याची पार्श्वभूमी माहीती काढून गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयातील महिला आरोपी 45 वर्षीय असुन,ती धारावी लिंक रोड, धारावी, येथे राहत असल्याचे निष्पन्न केले. आरोपी महिलेस गुन्हयात अटक करुन तीचे कडून गुन्हयातील 1 लाख 78 रुपये किंमतीचा एक सोन्याचा पंजाबी जेन्टस कडा 21.720 ग्रॅम वजनाचा हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा वाघमोडे,हे करीत आहेत.
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, राजेंद्र लगारे, सहाय्यक पोलीस आयुक्त नालासोपारा यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र तेंडुलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बोळींज पोलीस ठाणे, प्रकाश सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, सहाय्यक फौजदार जनार्दन मते, पोलीस हवालदार किशोर धनु, पोलीस अंमलदार रोशन पुरकर यांनी केलेली आहे.