Virar Crime News : कारची काच फोडून त्यामध्ये ठेवलेले पैशाची बॅग चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी केले अटक..
Virar Crime News Pelhar police Arrested Criminal : पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; सराईत चोरट्याला पोलिसांनी केले अटक, कारची काच फोडून करत होता चोरी.. सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा घेतला मागवा
विरार :- चारचाकी कारच्या Car Window काचा फोडून पैशाच्या बॅगी लंपास Bag Stole करणाऱ्या एका सराईत आरोपीला पेल्हार पोलिसांच्या Pelhar Police Station गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. विरार येथे राहणाऱ्या सचिन नागेंद्र दुबे यांनी आपली कार जी.के.पी. इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड चॅम्पियन कंपाऊंड सोपारा फाटा वसई येथे आपली सुझुकी कंपनीचे कार पार्क केली होती. यावेळी कारच्या चालकाच्या पाठीमागील बाजूच्या काच कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून त्या कारमधील सीटवर ठेवलेल्या पैशाची बॅग चोरट्याने Bag Stole लंपास केले होती. त्याच्या बॅगेत चार लाख दहा हजार रुपयांचे रोख रक्कम ही चोरट्याने लंपास केल्या बाबतची तक्रार दुबे यांनी पेल्हार पोलिसांना Pelhar Police Station दिली होती. दुबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात पोलिसांनी भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Virar Crime News
पोलिसांची कामगिरी सीसीटीव्ही च्या मदतीने आरोपीचा शोध
पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना घटनेच्या गांभीर्याबाबत लक्षात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करण्यास सांगितले. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या संशयित पाच ते सात व्यक्तींचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना आरोपी हा सोप्रा फाटा येथून नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नालासोपारा रेल्वे स्टेशन येथे रिक्षात बसून विरार रेल्वे स्टेशन कडे जाताना दिसला. परत पोलिसांनी विरार रेल्वे पोलीस स्टेशनच्या परिसरात शोध घेतले असता आरोपी हा विरार रेल्वे येथून गुजरातच्या बाजूकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसत असल्याचे पोलिसांना दिसले. तसेच आरोपी हा उमरगाव रेल्वे स्टेशन येथे उतरला असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे. पोलीस पथकाने उमरगांव येथील सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार मदतीने आरोपी हा उमरगांव वलसाड येथे असल्याचे पोलिसांना कळाले होते. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला वलसाड येथील उमरगाव येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव बबलू फकीरा जाधव उर्फ किशन (45 वर्ष) याला अटक 26 जून रोजी अटक केली होती. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपी याने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात कलम 379 प्रमाणे दोन गुन्हे पहिल्यापासूनच नोंद असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तसेच पोलिसांनी गुन्ह्यात चोरलेल्या रोख रकमेपैकी एक लाख 16 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. Virar Crime News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार मिथुन मोहिते, रवि वानखेडे, राहुल कर्पे, किरण आव्हाड, निखिल मंडलिक, अभिजीत नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. Virar Crime News