क्राईम न्यूज

Virar Crime News : गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड! – विरार गुन्हे शाखेची मोठी कारवाई; महिलेवर गुन्हा दाखल, लाखो रुपयांचा माल जप्त

Virar Police Busted Daru Adda : अर्नाळा, बंदरपाडा येथे बेकायदेशीर रसायन आणि दारू नष्ट; उत्पादन थांबवण्यासाठी पोलीस दलाची धडक मोहीम

विरार/अर्नाळा :- मीरारोड-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा-3 (विरार) Virar Crime Branch Unit 3 यांनी बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका महिलेवर आज (दिनांक 3 डिसेंबर) यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करत मोठ्या प्रमाणात रसायन नष्ट केले. Vasai Virar Police Latest News

गुन्हे शाखा कक्ष-3 चे पोलीस अधिकारी अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना अर्नाळा, बंदरपाडा येथे गावठी हातभट्टीची दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळच्या सुमारास तात्काळ छापा टाकला.

या कारवाईत एका तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे एकूण 2,350 लिटर रसायन (वॉश) आणि ४ लिटर तयार दारू असा एकूण 1 लाख 07 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

ही बेकायदेशीर हातभट्टी अरुणा प्रकाश नाईक (रा. बंदरपाडा, अर्नाळा, ता. वसई) यांची असल्याचे उघड झाले आहे. ही महिला स्वतः गावठी दारू बनवण्याचे काम करत होती. तिच्याविरुद्ध अर्नाळा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago