tulinj police virar Take Action On Room Owner : परदेशीय नागरिकांना घरबाडे देताना पोलिसांना न कळवल्याने पोलिसांची कारवाई, 25 घर मालकांवर गुन्हा दाखल
विरार :- घर भाडेतत्त्वावर Room Rent देताना पोलिसांना कळविणे बंधनकारक असते असे असतानाही घर मालकांनी परदेशीय नागरिकांना घरे देताना पोलिसांना न कळल्याने Virar Police टोळीच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 25 घर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात, तुळींज पोलीस ठाणेच्या हद्दीत प्रगतीनगर व मोरेगांव भागात मोठ्या प्रमाणात परकीय नागरिक हे घरे भाडे तत्वांवर घेवून राहवयास आहेत. विदेशी व्यक्ती अधिनियम 1956 चे कलम 7 अन्वये कोणताही Foreigner परदेशी नागरीकांना कोणत्याही घरात हॉटेल व व्यवसायीक तंत्यावर राहण्यास देणे, याबाबतची माहीती घरमालक, हॉटेल चालक यांनी 24 तासाच्या आत “सी फार्म” भरुन स्थानीक पोलीसांना परकीय नागरीक त्यांच्याकडे राहण्याकरीता आल्याची सुचना देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्याची तरतूद आहे. Virar Crime News
त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर, वसई-विरार यांनी मनाई आदेश सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये पारीत केले होते. त्यावरुन पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांनी भाडेकरु मनाई आदेश पारीत केल्यानंतर त्याबाबत पोलीसांनी वर्तमानपत्रे, भित्ती पत्रके याव्दारे समाजात जागृती केली होती.तरीही घरमालकांनी त्यांचेकडे परकिय नागरीक हे भाडेतत्वावर राहण्यास आले त्याचाचतची माहिती पोलीस ठाणेस न दिल्याने तुळींज पोलीस ठाण्यास एकूण 25 घरमालक यांचे विरोधात गुन्हे दाखल करुन घरमालकांना अटक करुन न्यायालया समक्ष हजर केले. Virar Crime News
त्यामुळे घर मालकांच्या विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने घर मालक आरोपी हे कारावासाची शिक्षा व दंडास पात्र राहणार आहेत. त्यामुळे सर्व नागरीकांनी भाडेकरु ठेवतांना त्यांची सर्व माहीती पोलीस ठाणेस दयाची. तसेच परकीय नागरीकांना घर भाडे तंत्यावर देताना त्यांचा “सी फॉर्म भरुन घेणे बंधनकारक आहे. तरी परदेशी नागरिक यांचा पासपोर्ट, व्हिजा” येध नसल्यास त्यांना घरे भाडचाने देवू नयेत असे पोलीसांकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. Virar Crime News
पोलीस पथक
पौर्णीमा चौगुले श्रींगी, पोलीस उप आयुक्त , परीमंडळ-2 वसई, उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलिस शिपाई अक्षय हझांजुणे, राहुल साळुंखे, असे तुळींज पोलीस ठाणचे अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…