Navghar Police arrested Smuggler Worth 8 KG Weed: अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या विरुद्ध पोलिसांचा कारवाईचा बडगा
विरार :- राज्यात अमली पदार्थाचे तस्करी खरेदी विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला असून, विरारमध्ये एका व्यक्तीला अमली पदार्थाची तस्करी करताना अटक केली असून त्याच्या जवळून जवळपास आठ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. नवघर पोलीस Navghar Police Staion ठाण्याचे दहशतवादी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, एक इसम हा नवघर रोड येथे 29 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गांजा हा अमली पदार्थ विक्री करिता येणार आहे. Virar Crime News
प्राप्त माहितीच्या अनुषंगाने नवघर पोलीस ठाणे दहशतवादी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार माळोदे, पोलीस हवालदार जावळे, पोलीस शिपाई तडवी असे यांनी दोन पंचानसह सदर ठिकाणी सापळा रचुन छापा कारवाई केली असता इसम नामे अरविंद दिपक चौरसीया, (27 वर्षे) विरार पूर्व राहणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतांना तो पळू लागला, त्यावेळी कौशल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेली एक पिशवी तपासली असता त्यात 08 किलो वजनाचा 1 लाख 60 हजार किंमतीचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आला म्हणून त्यास ताब्यत घेऊन नवघर पोलीस ठाणे एन.डी.पी.एस. 8 (क) 20 (च) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माळोदे, हे करित आहे. Virar Crime News
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, मिरारोड पूर्व, राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी, पोलीस निरीक्षक केदारे, पोलीस निरीक्षक गोमते, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक माळोदे, पोलीस हवालदार जावळे पोलीस शिपाई तडवी यांनी केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…