Virar Crime News : विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी; खुनातील गुन्हेगाराला 24 तासात अटक
खुनाच्या गुन्हयातील आरोपीस 24 तासाचे आत अटक करुन, गुन्हा उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
विरार :- (15 मार्च) विरार पोलीस ठाणेस माहिती मिळाली की, विरार पूर्व परिसरातील नारंगी ते कोपरी जाणाऱ्या कच्च्या रोडचे कडेला एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे. सदरची माहिती मिळताच विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी पोहचुन पाहणी केली असता, एक अनोळखी इसमाची कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी बोबड हत्याराने वार करुन, निघृण हत्या केली असल्याचे दिसुन आले. सदर मयत अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी विरार पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकारी व अंमलदारांची वेगवेगळी पथके तयार करुन, घटना ठिकाणच्या परिसराची माहिती घेतली असता, मयत व्यक्तीचे नाव-दिपक उमेश चव्हाण, (40 वर्षे), रा. नारायण निवास चाळ, जयश्री नगर, नारंगी गाव, विरार (पु.), असे असल्याची माहिती मिळुन आली. सदर बाबत मयत इसमाचे नातेवाईक भवरलाल सुधार, विरार यांचे तक्रारीवरुन विरार ठाणेत , भा.दं.वि.सं. कलम-302 प्रमाणे 15 मार्च रोजी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंद केला आहे. Virar Crime News
सदर खुनाच्या गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून,वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनांनुसार विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाची लागलीच वेगवेगळी 04 पथके तयार करुन, मयत इसम राहत असलेल्या परिसर पिंजून कातुन, तपासाच्या सर्व उपाय योजना राबवुन, मिळालेल्या माहितीचे आधारे इसम नामे. जयराम शंकर आंबेकर, (55 वर्षे) रा.विरार पूर्व, ता. वसई, यास ताब्यात घेवुन, त्याचेकडे कसोशिने आणि कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन दगडाने ठेचुन मयत यास जिवे ठार मारल्याची कबुली दिली. सदरच्या गुन्हयात कोणत्याही प्रकारचे कोणतेही धागेदोरे नसतांना, नमूद आरोपीस 24 तासाचे आत अटक करुन, सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपासा पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ हे करत आहेत. Virar Crime News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, विरार, सुहास बावचे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रकाश मासाळ, पोलीस निरीक्षक (प्रशासन), व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उप निरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, पोलीस अंमलदार संदिप शेळके, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार, तसेच पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे, व पोलीस अंमलदार सोहेल शेख, यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.