Virar Crime News : ऑनलाइन फसवणूक ; बँकेच्या केवायसी च्या अपडेट करण्याचे सांगून ऑनलाइन फसवणूक
•Virar Crime News सायबर पोलिसांची कामगिरी ; ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम परत देण्यास यश
विरार :- ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत असताना पोलिसांकडून ऑनलाईन फसवणूक रोखण्याकरिता विविध उपाययोजना केली जात आहे. पोलिसांकडून सातत्याने ऑनलाइन फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले जातात परंतु अनेक वेळा कळत नकळत लोक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडतात अशातच मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या एका महिलेची रक्कम परत करून देण्यास यश आले आहे.
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या जान या महिलेला बँकेचे केवायसी अपडेट करण्याचे असल्याचे सांगून त्यांचे आर्थिक फसवणूक केल्याची घटना सायबर विभागाकडे नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ महिलेच्या अकाउंटमधील गडद झालेली रक्कम रोखून धरण्यास यश आले आहे. संशयित कागदावर वरती केलेले रक्कम पोलिसांना गोठवण्यात यश आले तक्रारदार यांच्या तक्रारीवरून संबंधित बँक आणि न्यायालय यांच्याशी पत्रव्यवहार करून संशयित रक्कम गोठवलेली मूळ खात्यावर परत आणून देण्यास पोलिसांना यश आले आहे. यामध्ये महिलेचे 99 हजार 800 रुपयाची आर्थिक फसवणूक झालेली रक्कम परत महिलेच्या खात्यावर जमा करण्यास पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पल्लवी निकम, पोलीस अंमलदार शुभम कांबळे, राहुल बन यांनी पार पाडली आहे.