Virar Crime News : Investment App मध्ये ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील 11 लाख 14 हजार 250 रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश
विरार :- Investment च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणुकी झाल्याच्या घटना समोर येत आहे. परंतु इन्व्हेस्टमेंट च्या नावाखाली केलेली गुंतवणूक आणि फसवणूक झालेले रक्कम परत करण्यास पोलिसांना यश आले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील वालीव पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार गुप्ता यांनी टेलीग्राम ॲपवर Investment App मध्ये गुंतवणुक करुन दुप्पट रक्कम मिळत असल्याचाबत जाहिरात पाहून ॲपमध्ये पैसे गुंतवणुक केली. जाहिरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार यांनी एकुण 11 लाख 14 हजार 250 रक्कमेचा भरणा केला. तक्रारदार यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा कोणताही परतान न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचाचत Virar Crime News
तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज प्राप्त होताच झालेल्या व्यवहाराची सविस्तर माहिती घेवुन संबंधीत बैंकेसोबत तात्काळ पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांची रक्कम गोठविण्यात आली. सदरबाबत वालीव पोलीस ठाणे भादविस कलम 420 सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 ड प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. Virar Crime News
नमूद तक्रारी अर्जाचे तसेच गुन्हयाचे अनुषंगाने संबंधीत बैंकेसोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांची रक्कम वेळीच संशयीत बैंक खात्यांमध्ये गोठविण्यात आली. त्यानंतर तक्रारदार यांची रक्कम त्यांचे मुळ खात्यात जमा होणेकरीता न्यायालयात वेळोवेळी पाठपुरावा करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली एकुण 11 लाख 14 हजार 250 रक्कम न्यायालयाचे आदेशाने तक्रारदार यांचे मुळ खात्यात परत मिळविण्यात आलेली आहे. Virar Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, सुपर्णा माळी, महिला पोलीस हवालदार माथुरी धिंडे, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल सावळे, राजेश भरकडे,आकाश बोरसे यांनी पार पाडली आहे.
नागरीकांना आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…