मुंबई

Virar Crime News : दगडाने ठेचून खून:अनैतिक संबंधातून महिलेचा खून

•अनोळखी मृत महिलेची ओळख पटवुन आरोपीतास ताब्यात घेवुन खुनाचा गुन्हा 8 तासाच्या आत उघड करण्यात गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांना यश

विरार :- अनैतिक संबंधातून 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना फुलपाखरा वाडा रस्त्यावर रविवारी (24 एप्रिल) सायंकाळी घडली.
सदर माहितीच्या अनुषंगाने द्वारकानगरी जवळील झोपडपट्टी, फुलपाडा रोड येथील नाम्या कातकरी पाडा मध्ये मयत महिले बाब शोध घेतला असता सदर ठिकाणी मयत महिला ही कुटूंचियासह राहत असुन तिचे नाव सकु शांताराम भोईर,( वय 50 रा. नाग्या कातकरी पाडा, फुलपाडा रोड, विरार पूर्व) असे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सदर महिलेच्या शेवटच्या हालचालींबाबत कुटुंबियांकडे विचारणा करता त्यांचे कुटूंबातील मयत महिलेचा पती शांताराम रेशम भोईर, मुलगा अंकुश शांताराम भोईर, मुलग सौ. पूजा अरुण बंजारी, सुन सौ. दिपाली दिपक जाधव अंकुश भोईर यांचे जबाबात तफावत आढळून आली. त्याची सत्यता पडताळून पाहता महिलेचा पती नामे शांताराम रेशम भोईर याचेकडे सखोल चौकशी करता त्याने मयत महिला सकु हिचे त्या परिसरात राहणारा इसम नामे शिवा सहाणी वाचे सोबत अनैतिक संबंध असल्याने त्यांचेमध्ये नेहमी भांडणे होत असत.

25 दरम्यान पत्नी घरी न आल्याने तिचा शोध घेत नरेश पाटील यांचे वाडीत गेला असता त्याची पत्नी सदर ठिकाणी झोपली असल्याचे दिसून आले. त्यावेळी आरोपीत शांताराम भोईर याने मयत महिला सकु हिला घरी येण्याचा आग्रहधरला असता त्यास तिने नकार दिल्याने त्यांचेत भांडण झाल्याने आरोपी शांताराम भोईर याने त्याठिकाणी असलेला दगड त्याचे पत्नीचे डोक्यात घालुन तिचा खुन केल्याचे कबुल केले आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने मयत महिला हिची मुलगी सी. पुजा अरुण बंजारी हिने दिलेल्या तक्रारी वरुन विरार पोलीस ठा. कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास वरिष्ठ अधिकलकंएल.एम.तुरे, विरार पोलीस ठाणे हे करीत आहेत.

अशा प्रकारे गुन्हा घडल्याबाबतची माहिती मिळाल्यापासून अथक परिश्रम करुन आठ तासाच्या आत गुन्हे शाखा कक्ष-आठ यांनी अनोळखी मयत महिलेची ओळख पटवुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेतले आहे.

vivek

Recent Posts