Virar Crime News : बँकेमधील शिल्लक पाहण्यासाठी ॲप वापर करतांना खात्यातून पैसे झाले कट, सायबर विभागाकडून पैसे परत मिळवून देण्यास यश
Virar Cyber Crime News : सायबर पोलीस ठाण्यास यश; तक्रारदार यांचे खात्यातुन कपात झालेले 2 लाख 39 हजार 119 रक्कम तक्रारदार यांना परत
विरार :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नायगांव परीसरात राहणारे पाटील हे त्यांचे मोबाईल मधील बैंक ॲपमधुन शिल्लक रक्कमेची पाहणी करीत असताना त्यांचे बैंक खात्यातून 2 लाख 39 हजार 119 रु कपात झाल्याचे लक्षात आले. तक्रारदार यांचे खात्यातून कपात झालेल्या रक्कमेच्या तक्रारीकरीता त्यांनी ऑनलाईन व्यवहार करीत असताना 2 लाख 39 हजार 119 रु ची फसवणुक झाल्याबावत सायबर पोलीस ठाणे ( Cyber Police Station ) येथे दिनांक 1 मे 2024 रोजी तक्रारी अर्ज दिला होता. Virar Cyber Crime News
नमूद तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहारबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे खात्यातून झालेले व्यहार तात्काळ रोखण्याकरीता तसेच त्यांची रक्कम मूळ खात्यावर जमा होणेकरीता संबंधीत बैंकेला पत्रव्यवहार करण्याबाबत कळविण्यात आले. सायबर पोलीस ठाणेकडून करण्यात आलेल्या तात्काळ पत्रव्यवहाराचे अनुषंगाने तक्रारदार यांची फसवणुक झालेली 2 लाख 39 हजार 119 रु तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे. Virar Cyber Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिराबाई इंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, यांनी पार पाडली आहे. Virar Cyber Crime News
नागरीकांना आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोचत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…
ऑनलाईन व्यवहार करीत असताना अगर इतर खात्यात रक्कम वर्ग करीत असताना बैंक खात्याची खात्री
केल्याशिवाय व्यवहार करु नये. बैंक/क्रेडीट कार्ड बैंक कोणत्याही प्रकारे ग्राहकांना एसएमएस किंवा फोनवर संपर्क साधून वैयक्तिक
गोपनीय माहिती विचारणा करत नाही.
आपले बैंक खाते, जन्मदिनांक, OTP चा इतर वैयक्तीक माहीती उघड करू नये.
अनोळखी लिंक, ॲप्लीकेशन डाऊनलोड करू नये.
ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बैंकेला संपर्क करावा.