Virar Crime News : तब्बल 102 हरविलेले मोबाईल शोधण्यास पोलिसांना यश
Virar Police Successfully Recovered 102 Stolen Mobile : काशिमिरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास रुपये 17 हजार 55 हजार किंमतीचे 102 हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश.
मिरा रोड :- काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन Stolen mobile हरवल्याबाबत पोलीस ठाणेस Virar Police Station तक्रारी नोंद होत असतात. मोबाईल फोन हरविल्यानंतर मोबाईल फोनची माहीती ही भारत सरकारने सुरु केलेल्या सी.ई.आय. आर पोर्टलवर भरुन त्यातुन प्राप्त माहीतीचा तांत्रिक अभ्यास करुन तसेच हरविलेल्या मोबाईलबाबत इतर तांत्रिक बाबींचा अभ्यासाचे आधारे मागील पाच महिन्याचे कालावधी मध्ये वेगवेगळया कंपनीचे एकूण 102 मोबाईल फोन अंदाजे रुपये 17 लाख 55 हजार किंमतीचे हस्तगत करण्यात आलेले आहे. Virar Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त यांचा मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-01, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, सहाय्यक फौजदार रमेश इगवे, अनिल पवार, पोलीस हवालदार दिपक वारे, प्रताप पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, निकम, पोलीस शिपाई रवी कांबळे, प्रविण टोबरे, किरण विरकर, राजेंद्र सुर्यवंशी आणि पोलीस हवालदार जयप्रकाश जाधव नेमणुक पोलीस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ-01 यांनी केलेली आहे. Virar Crime News