Virar Crime News : काशिगांव पोलीसांना कामगिरी ; फरार आरोपीला केले अटक
Virar Crime News : जबरी चोरीच्या गुन्हयात 05 वर्षांपासून फरार आरोपीस अटक करण्यात काशिगांव पोलीसांना यश
विरार :- पाच वर्षापासून फरार असलेला आरोपी काशिगांव पोलिसांनी केले अटक केली आहे.फिर्यादी रिटाबेन योगेशकुमार पटेल, रा. आरती पॅलेस, स्वामी नारायण मंदिर जवळ, अहमदाबाद, राज्य गुजरात यांचे पती योगेश कुमार यांना आरोपी 1. मुबारक अली कमजुमा खान, 2.अंकुश अनिलभाई अगरवाल, 3.लल्लु यांनी फाऊटन हॉटेल येथे बोलावून त्यांना मारहाण करून त्यांचे ताब्यातील 60 हजार रु. रोख रक्कम, पैन कार्ड, आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा, भादंविसं कलम 364 अ. 365, 394, 325, 326, 323, 34 प्रमाणे 13 मार्च 2019 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. Virar Crime News
नमुद गुन्हा दाखल झाले नंतर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोलीस उप-निरीक्षक, आनंद भगत यांनी करुन त्यांनी 21 जुन 20219 रोजी आरोपी नामे 1. मुबारक अली कमजुमा खान, (48 वर्ष) रा सी/७०४, रिजवान अपार्टमेन्ट, बोरिवली, जोगेश्वरी, मुंबई 31 जुलै 2019 रोजी 12.22 वा. आरोपी 2. अंकुश अनिलभाई अगरवाल, (24 वर्ष), यांस मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. Virar Crime News
गुन्हयातील पाहिजे आरोपी लल्लू हा गेले 05 वर्षापासून स्वतःचे अस्तित्व लपवून रहात असल्याने मिळून आलेला नव्हता.
14 मार्च पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या प्रेरणेने नवनिर्मीत काशिगांव पोलीस ठाणे कार्यान्वीत झाल्यानंतर, पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे आरोपींची विभागणी करून, त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे राबविण्यात येत असलेल्या ऑल आऊट ऑपरेशन , सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असतांना, यातील नमूद पाहिजे आरोपी नामे लल्लु हा निलकमल नाका बाजारात असल्याची खात्रीलायक बातमी गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त झाली. सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर परीसरात शोध घेतला असता, एक इसम संशयास्पदरित्या फिरताना मिळून आल्याने, त्यास पोलीस पथकाने हटकून, त्याच्याकडे चौकशी केली असता, तो पळून जावू लागल्याने, त्याचा पाठलाग करून, त्यास ताब्यात घेवून पोलीस ठाण्यास आणून, त्याचेकडे विचारून चौकशी केली असता, त्याचे नांव सत्यनारायण राम कैलास पाल ऊर्फ लल्लू (44 वर्ष), व्यवसाय ट्रान्सपोर्ट,असे असून, तो नमूद गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे समजून आले. त्याच्याबाबत त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा करून, गेली पाच वर्षे तो स्वतःचे अस्तित्व लपवून पोलीसांपासून लपून राहत होता, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यास नमूद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. Virar Crime News
पोलीस अटक
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय अपर पोलीस आयुक्त, श्रीकांत पाठक, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 01 प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, डॉ. विजय मराठे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुलकुमार पाटील, काशिगांव पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण बघदाणे, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश पाटील, पोलीस हवालदार राहुल वांळुज, पोलीस अंमलदार प्रविण टोबरे, उमंग चौधरी, किरण विरकर यांनी केलेली आहे.