Virar Drug Busted News : अटकेच्या वेळी 56 लाखांचे ‘ॲम्फेटामाइन’ जप्त; कळंब-राजोडी परिसरातून मुसक्या आवळल्या
विरार :- विशेष प्रतिनिधी अंमली पदार्थांच्या काळ्या दुनियेत ‘हेन्री’ या नावाने दहशत पसरवणाऱ्या आणि कोट्यवधींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या नायजेरियन तस्कराच्या अखेर वसई गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. तुळींज पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील 5 कोटी 60 लाख रुपयांच्या मेफेड्रॉन (M.D.) तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार उवाके हेन्री युचेन्ना याला विरारच्या किनारपट्टी भागातून फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्यावेळी पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले, त्यावेळीही त्याच्याकडे 56 लाखांचे ‘ॲम्फेटामाइन’ नावाचे ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे.
गुप्त माहिती आणि थरारक सापळा गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस हेन्रीच्या मागावर होते, मात्र तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता. वसई गुन्हे शाखा कक्ष-2 चे सहाय्यक फौजदार मुकेश पवार यांना त्यांच्या विश्वासू बातमीदाराकडून एक अत्यंत खात्रीशीर टीप मिळाली की, हा हायप्रोफाईल तस्कर विरारच्या कळंब-राजोडी समुद्रकिनाऱ्यालगतच्या निर्जन भागात लपून बसला आहे. या माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने कोणतीही वेळ न घालवता तातडीने राजोडी रोडवर सापळा रचला. 17 डिसेंबर रोजी दुपारी च्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या हेन्रीला पोलिसांनी घेराव घातला आणि त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.
अटकेच्या वेळीही कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त हेन्रीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 280 ग्रॅम वजनाचा अत्यंत महागडा ‘ॲम्फेटामाइन’ हा अंमली पदार्थ सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 56 लाख 12 हजार रुपये इतकी आहे. तुळींज येथील 5 कोटी 60 लाखांच्या एम.डी. गुन्ह्यात तो आधीच ‘मोस्ट वाँटेड’ होता, त्यात आता या नवीन ड्रग्ज साठ्यासह सापडल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधून ड्रग्ज तस्करीचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-2 चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील आणि त्यांच्या बहादूर पथकाने ही गुंतागुंतीची कामगिरी फत्ते केली. या अटकेमुळे पालघर आणि वसई-विरार पट्ट्यातील नायजेरियन ड्रग्ज पेडलर्सच्या साखळीला मोठा सुरुंग लागला असून, हेन्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि त्याने आतापर्यंत कोणाकोणाला ड्रग्जचा पुरवठा केला, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…